Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीअवकाळी पावसाने धान पिकाला झोडपून काढले
spot_img

अवकाळी पावसाने धान पिकाला झोडपून काढले

धान पिकाचे पंचनामे करून मदत मदत द्यावी — शेतकऱ्याची मागणी. कडोली वार्ताहर:- कुरखेडा तालुक्यातील कडोली परिसरातील अवकाळी पावसाने झोपून काढले यामुळे धान पिकासह इतर पिकाची नुकसान झाली आहे संबंधित यंत्रणेने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा अशी शेतकऱ्याची मागणी आहे कडवली परिसरात 28 नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या व रचून ठेवलेल्या धानाची नुकसान झाले या परिसरात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय धान उत्पादन आहे यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचे वर्षभराचे नियोजन होते धान कापणी सुरू आहे बहुतांश शेतकऱ्यांची धान कापून ठेवलेल्या आहेत व बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे आहे अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील धान्याचे कडप तसेच उभे दान पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे शासन व विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावे अशी मागणी कडोली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या धानकळपांचा त्वरित पंचनामा करून शासन व विमा कंपनीने याकडे लक्ष वेधून त्वरित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी कडवली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page