Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीअज्ञात इसमाने धानाच्या गंजीची केली जाळपोळ.
spot_img

अज्ञात इसमाने धानाच्या गंजीची केली जाळपोळ.

धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातील बोधनखेडा येथे दि.28 नोव्हेंबर च्या रात्री 8 ते 8.30 दरम्यान अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या धान पुंजनाला आग लावून जाळपोळ केली आहे. त्यामध्ये संपूर्ण धान जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकटं कोसळले.
सविस्तर वृत असे की ,बोधनखेडा येथील शेतकरी घसिया बोगा व बाजीराव कुमोटी हे अल्पभूधारक शेतकरी असून मागील काही दिवसांपासून धान कापून भारे बांधून त्याचे पुंजने तयार करून ठेवले होते. काही दिवसांनी ते क्रेशर मशिन लावुन चुरना करणारच होते. त्याआधीच अज्ञात इसमाने दिनांक 28 च्या रात्री ते पेटवून दिले. व हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने श्री. घासिया बोगा यांचे 250 भारे व बाजीराव कुमोटी यांचे 300 भारे जळून खाक झाले असून यंदाची पूर्ण कमाई नष्ट झाली आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कारवाई करून दोन्ही शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडून मदतीची मागणी केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page