Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी पोलीस स्टेशन तर्फे स्पर्धेतील विजेताना बक्षिस वितरण
spot_img

चामोर्शी पोलीस स्टेशन तर्फे स्पर्धेतील विजेताना बक्षिस वितरण


चामोर्शी :- – दिनांक २५ नोव्हेबर रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फतीने.पोलीस स्टेशन चामोर्शी येथे आयोजित विर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व भगवान बिरसा मुंडा व्हालीबॉल स्पर्धा तसेच आदिवासी रेला नृत्य स्पर्धा आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेकरती पोस्ट हद्दीतून अनेक संघाने नाव नोंदणी केली. वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धे करती एकूण बारा संघांनी नाव नोंदणी केली त्यापैकी उत्कृष्ट खेळ करून विद्यार्थी संघ मोहुली यांनी प्रथम पारितोषिक पटकावले, वीर मराठा कबड्डी क्लब चामोर्शी, तृतीय पारितोषिक वाकडी संघाने पटकावले आहेत, तसेच भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धे करती पोस्टहद्दीतून सहा संघाने सहभाग घेतला त्यामध्ये प्रथम पारितोषिक श्री छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल संघ चामोर्शी, द्वितीय पारितोषिक संभाजी महाराज व्हॉलीबॉल संघ विष्णुपुर, तृतीय पारितोषिक वीर मराठा चामोर्शी संघाने पटकावले तसेच पोस्ट यादीतून आदिवासी रेला नृत्य करिता पाच रेला संघांनी सहभाग नोंदविला . त्यामध्ये प्रथम पारितोषिक डी वायरस ग्रुप चामोर्शी, बिरसा मुंडा रेला ग्रुप मुतनूर यांनी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक झेडपी शाळा चामोर्शी याप्रकारे उत्तम असा खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .ज्या संघाने उत्कृष्ट खेड किंवा आदिवासी डान्स केला त्या संघांना अनुक्रमे रोख पारितोषिक डान्सखालील प्रमाणे देण्यात आले
( कबड्डी, व्हॉलीबॉल, आदिवासी रेला नृत्य )
1) प्रथम विजेता संघ –
बक्षीस – ३000/-
2) द्वितीय विजेता संघ.
बक्षीस – २000/-
3) तृतीय विजेता संघ-
बक्षीस – १000/-

सदर कार्यक्रमास उपस्थित स्पर्धक तसेच 250 ते 300 प्रेक्षकांना चहाची व जेवणाची,ची व्यवस्था करण्यात आली . या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील , पत्रकार अमित साखरे व पोलीस उपनिरीक्षक , पोलीस कर्मचारी यांचे हस्ते देण्यात आले . या कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page