Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरओबीसी नेता संदीप पारखी यांच्या प्रयत्नातून बाबापुर-मानोली ग्रामपंचायतच्या सरपंच व उप सरपंच...
spot_img

ओबीसी नेता संदीप पारखी यांच्या प्रयत्नातून बाबापुर-मानोली ग्रामपंचायतच्या सरपंच व उप सरपंच चा भाजप प्रवेश


राजुरा प्रतिनिधी 27 नोव्हेंबर:-
नदीपट्टा अशी ओळख असलेल्या बाबापुर-मानोली ग्रामपंचायत निवडणुकीचा नुकताच निकाल लागला असून भाजपच्या परावर्तित पॅनल ने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. या ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशा साठी ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदिप पारखी यांनी विशेष प्रयत्न केले.त्यांनी भाजपची विचारसरणी पटवून सांगत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार असल्याचे सांगितले. नक्षत्र लॉन मध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली दीपोत्सव स्नेहमिलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बाबापुर-मनोली ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. सरपंच सौ मंगला आत्राम, उपसरपंच सत्यशीला वरारकर व ग्रामपंचायत सदस्य गुडडी पाल,सुभाष आत्राम,वच्छला कन्नके व गावकरी रामदास करट बुज, रमेश पिंपळशेंडे, राजेंद्र गौरकार, विकास करडबुजे,राजू पाल,राजू गाढवे,पिंटू कायडिंगे,इंद्रजित वनकर,धनराज वनकार, निलेश मिलमिले,प्रशांत वरारकार, शुभम पेरकांडे, गोलू अडवे, अनुप झाडे यांनी पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशासाठी ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री संदीप पारखी यांनी पक्षाचे ध्येयधोरण व विचारसरणी पटवून सांगितली व गावाच्या विकासा सोबतच मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या पक्ष प्रवेशा वेळी माजी आमदार संजय धोटे व प्रदेश कार्यकारणी सदस्य खुशाल बोनडे उपस्थित होते.याच कार्यक्रमात भाजपा च्या निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page