Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरशेतक-यांच्या पिकांची नासाडी करणा-या रानडुकरांना मारण्याची परवानगी द्या--बाबा मस्की व शोभा मस्की...
spot_img

शेतक-यांच्या पिकांची नासाडी करणा-या रानडुकरांना मारण्याची परवानगी द्या–बाबा मस्की व शोभा मस्की यांची मागणी


राजुरा, ता.प्र. –
राजुरा मागील 20 वर्षापासून राजु-यातुन विदर्भ राज्याची व मराठवाडा राज्याची मागणी करणारे, विविध आंदोलने, टॉवर आंदोलने, लोटांगन आंदोलने, बसेस फोडणे, गदा घेऊन सरकारी ऑफीस मध्ये जाऊन आंदोलन करणे तेलंगणा राज्यासाठी व विदर्भ राज्यासाठी अनेकदा पदयात्रा करणारे देशप्रमी संघटनेचे बाबा मस्की व त्यांची पत्नी शोभा मस्की हे दोघे सतत गांधीगीरी करून शेतक-यांचे व गरीब जनतेचे व महिलांचे प्रश्न घेऊन सतत चर्चेत असतात.
दिनांक 15 आक्टोंंबर 23 पासून मानिकगड पहाडावरील जीवती येथे विविध मागण्यांसाठी आपण सपत्निक आंदोलन करीत आहोत. मात्र सरकार शेेतक-यांच्या या ज्वलंत प्रश्नांची दखल घेत नसून त्यामुळे शेतक-यांनी तीव्र आंदोलन केले पाहिजे, असे मत देशप्रेमी संघटनेचे बाबा मस्की यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शेतात धुडघुस घालुन पिके उध्वस्त करणा-या डुकरांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा त्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी, जीवती तालुक्यातील शेतक-यांना जमिनीचे पट्टे द्यावे, जीवतीच्या 664 घरकुल योजनेला मंजुरी द्यावी आदी मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्याचे बाबा मस्की यांनी सांगितले. मागण्या पूर्ण न झाल्यास 30 नोव्हेंबर पासून शोभा मस्की या अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. आपण या आंदोलनाच्या अनुषंगाने सत्ताधारी लोकांना उद्देशुन विडिओ बनविला, त्यात लोकांच्या मागणीविषयी बोलतांना आपण संतापाने काही कमी अधिक बोललो मात्र, माझा उद्देश शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, त्यांच्या दु:खाकडे लक्ष वेधण्याचा होता. सत्ताधा-यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे बाबा मस्की म्हणाले. या प्रकरणात पोलिसांनी आपल्यावर गुन्हा नोंदविला आणि पुन्हा कलम 110 अंतर्गत कारवाई करीत एक दिवस चंद्रपूर जेल मध्ये ठेवले, हा सत्तेचा दुरूपयोग आहे. जीवती येथील आंदोलन स्थळावरील बॅनर काही लोकांनी फाडून टाकले, हे भाजप कार्यकर्त्यांचे कृत्य असून ते दुर्दैवी आहे. सरकारने माझ्यावर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे मत बाबा मस्की व शोभा मस्की यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी प्रशांत गड्डम, रोहण सिगरू, सचिन खंडे, व्यंकटेश गादामल्लु, कुणाल खंडे, श्रीधर गुर्दी, बब्बुभाई शेख, रवि आत्राम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page