Friday, February 23, 2024
HomeUncategorizedधानोरा तालुक्यातील 100गावे मोबाईल कव्हरेज पासुन कोसो दूर
spot_img

धानोरा तालुक्यातील 100गावे मोबाईल कव्हरेज पासुन कोसो दूर


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुका अतिदुर्ग असून नक्षलग्रस्त असलेल्या तालुक्यात इंटरनेट तर दूरच पण साधा मोबाईल कव्हरेज नसल्याने तालुक्यातील आजही 100 गावे मोबाईल कव्हरेज पासुन कोसो दुर असल्याने धानोरा तालुक्यातील जनता मोबाईल नेटवर्क पासुन वंचित आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या पुर्व दिशेला असलेला धानोरा तालुका डोंगराळ अतिदुर्गम नक्षलग्रस्त अशिच ओळख आहे.आधिच धानोरा तालुक्यातील अनेक गावातिल लोकांना जिवनावशक सुविधा उपलब्ध नाही.रस्ते नाहीत, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत.मग इंटरनेट सुविधा कुठून मिळणार कारण तालुक्यातील 100गावे भ्रमणध्वनी मनोरा पासुन लांबच आहेत.मग नेटवर्क नाही.मोजुन बोटावर मोजता येईल तेवढ्याच गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध होते.जनता जनार्धनानी घेतलेले मोबाईल म्हणजे शोपिस , मुलांचे खेळणे बनले आहे.
तालुक्यात अनेक गावात ऑनलाईन काम करताना मोठी अडचण निर्माण होते आणि तालुक्याच्या ठिकाणीही हे समस्या असल्याने ग्रामीण भागात शंभर गावात टॉवर उभारण्याची नितांत गरज आहे मोबाईल सध्या चैनीची वस्तू नाही धावपळीच्या जीवनात मोबाईलला महत्व प्राप्त झाले आहे.म्हणुनच मोबाईल आज घराघरात पोहोचले मात्र अनेक ग्रामिण भागातील खेडोपाडी असलेले मोबाईल शोपीस आहेत. म्हणून गावागावात टावर उभारण्याची गरज आहे. जिल्ह्यातील 519 गावांमध्ये अजूनही मोबाईल कव्हरेज पोहोचलेले नाही. या गावांमध्ये झाडावर चढवून फोनचा नेटवर्क शोधावे लागते. नेटवर्क शोधण्यासाठी लोक आजूबाजूची जागा पाहतात आणि खूप मोठ्या प्रमाणात जंगलांनी वेढलेल्या या जिल्ह्यात दूरसंचार सेवेची सुरुवात bsnl केले ग्रामीण भागात टावर उभारले परंतु लोकांचे गरज लक्षात घेऊन खेडेगावात टॉवरची संख्या वाढविणे आवश्यक आहे .अजूनही ग्रामीण व दुर्गम भागात बीएसएनएलचे सीमा असल्याचे दिसून येते.अलिकडे खाजगी कंपन्यांनी ग्रामीण भागात टावर उभारण्यास सुरुवात केली मात्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या धानोरा तालुक्यातील गावापर्यंत अजूनही कव्हरेज पोहोचलेले नसल्याची शोकांतिकाच आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page