Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीतहसिलदार,नायब तहसिलदारांचा बेमुदत कामबंद संपाचा इशारा
spot_img

तहसिलदार,नायब तहसिलदारांचा बेमुदत कामबंद संपाचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्र्यांच्या आदेशानतंरही मुख्य अप्पर सचिव यांचा मनमानी कारभार

प्रतिनिधी गडचिरोली:– राज्यातील ३६ जिल्हयात येत्या १ डिंसेबर पासून तहसिलदार व नायबतहसिलदार बेमुदत कामबंद संपावर जात असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी स्पष्ट केले आहे.३ मार्च २०२३ रोजी राज्यभरातील तहसिलदार नायब तहसिलदार यांनी बेमुदत कामबंद संप पुकारला होता त्यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसिलदार संघटनेची मागणी माण्य करत स्वाक्षरी करुन राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुरी केलेल्या प्रस्तावाला आता अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून केरांची टोपली दाखवत असल्याचे तहसलिदार संघटना कडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे राज्यभरातील तहसिलदार,नायब तहसिलदार यांनी नाराजी व्यक्त केली असून राज्यातील तहसिलदार,नायब तहसिलदार यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या व अधिकार दिले जातात मात्र पगार वाढ होत नसल्याने येत्या १ डिंसेबर पासून राज्यभरातील तहसिलदार ,नायब तहसिलदार हे बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले आहे.ह्या बेमुदत कामबंद संपामुळे शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्याना आता नविन वर्षात शासकीय दाखल्यापासुन वंचित राहवे लागणार आहे.त्याचबरोबर शासन आपल्या दारी ह्या उपक्रमाला देखील फटका पडणार असल्याचे बोलंल जात आहे,त्यामुळे नवर्षाच्या स्वागताला अश्या प्रकारच्या संपामुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी ताटगळत राहव लागणार आहे.त्यामुळे हा संप कधी मागे घेतला जाईल मुख्य अप्पर सचिव हा प्रस्ताव कधी पुर्ण करतील हेच पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page