Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरइन्फंट काॅन्व्हेंट येथे दीपोत्सव जल्लोषात साजरा.
spot_img

इन्फंट काॅन्व्हेंट येथे दीपोत्सव जल्लोषात साजरा.

राजुरा (ता. प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दीपोत्सव आणि दिवाळी सुट्ट्यात येणाऱ्या बालक दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांनी मोठ्या जल्लोषात दिपोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्त्व नाट्यीकरण करून पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या विविध कृतीयुक्त उपक्रमाची प्रदर्शनी सुद्धा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष निमंत्रण देऊन त्याचे निरीक्षण करावयास सांगितले. या प्रसंगी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी नृत्य, गीत गायन, नक्कलांचे सादरीकरण केले. शाळा व्यवस्थापन समितीने सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त व बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दीपोत्सव कार्यक्रमाचे संचालन कुमारी तन्वी चटके, कुमारी पूजा पानसे या विद्यार्थिनींनी केले. बालक दिनाचे सूत्रसंचालन सौ. विद्या चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विशेष करून विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page