Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीअशोक सहारे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार
spot_img

अशोक सहारे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार


चामोर्शी :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शी यांचे वतीने राजे धर्मराव विद्यालय रेगडी येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक सहारे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार हनुमान मंदिर , साधू बाबा कुटी मुल रोड चामोर्शी येथे करण्यात आला .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विमाशीचे कार्याध्यक्ष कैलास भोयर यांनी भूषविले तर सत्कारमूर्ती म्हणून अशोक सहारे आणि प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय कुनघाडकर ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालिदास बनसोड , उपाध्यक्ष अरविंद कुनघाडकर , प्राचार्य इतेंद्र चांदेकर , कोषाध्यक्ष पोपेश्वर लडके ,विनोद सालेकर तालुका प्रसिद्धीप्रमुख गजानन बारसागडे महेंद्र किरमे , संजय आलेवार , हास्याविनोद उंदीरवाडे , स्मिता चट्टे , संतोष बोडूकवार , अशोक टिचकुले , प्रकाश मट्टे आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष संजय कुनघाडकर यांनी तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page