Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीपोलिसांच्या मदतीने 200 जणांची आरोग्य तपासणी
spot_img

पोलिसांच्या मदतीने 200 जणांची आरोग्य तपासणी


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
गडचिरोली जिल्हा पोलिस च्या पोलिस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून व पोलिस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे , कुमार चिंता, यतिश देशमुख यांच्या संकल्पनेतून व धानोरा चे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पोलिस मदत केंद्र सावरगाव येथे भव्य जनजागरण मेळावा व आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हद्दीतील 200 आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबतच 200 महिलांना साड्या 50 पुरुषांना धोती व 50 गरजूंना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले.

मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट अजय लकडा यांनी केले तर अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी पो.उपनि प्रकाश लोखंडे व प्रमुख पाहुणे म्हणून पीआय शेंडे, श्रेणी पो उप नी राउत,सरपंच मोनिका पुडो, गावपाटील रामसाय गावडे , सावरगाव रुग्णालयातील डॉ.कन्नाके मॅडम आदी हजर होते.

आदिवासी बहुल नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलिस दल विविध सामाजिक उपक्रम राबवत असते त्यांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन पो उप नी लोखंडे यांनी केले. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
आयोजित आरोग्य मेळाव्यात मलेरिया सिकलसेल शुगर बीपी मोतीबिंदू सारख्या तपासण्या व लहान मुले व स्त्रियांचे आरोग्य तपासणी केली. व त्यांना मोफत औषधगोळ्या चे वाटप करण्यात आले. यासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू हजर होता. यावेळी डॉ. सोम्या यांनी उपस्थित स्त्रिया व युवतींना महिलांच्या आजाराविषयी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी हद्दीतील 350 लोकांची उपस्थिती होती.जनजागरण मेळाव्यामध्ये पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून खालील योजनांचा लाभ देण्यात आले.25लोंकांचे आधारकार्ड अपडेट करण्यात आले,13 आयुष्यमान कार्ड काढण्यात आले,18नविन पँनकार्ड बनविण्यात आले, यासोबतच
कास्ट सर्टिफिकेट,वंशावळी स्वयंघोषणापत्र,आभा कार्ड सुद्धा काढण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो. उप नी विश्वंभर कराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन परि पो उप नी राजेन्द्र कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पोलिस चे नैताम, कुंनघाडकर, कापगाते, कोवे, काळबांधे, गेडाम, कडते व एसआरपीएफ गट क्रमांक 7 चे सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page