Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कंत्रटदार कडून रस्ते कामावर रेतीचा वापर
spot_img

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कंत्रटदार कडून रस्ते कामावर रेतीचा वापर

राज्य शासनाच्या रेती धोरणाचा फज्जा. बादल बेले राजुरा प्रतिनिधि:- राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग करिता जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती निश्चित करून काही नाले व तलावांचे उत्खनन करण्याची परवानगी दिली होती मात्र राष्ट्रीय महामार्ग तंत्रज्ञान जी आर आय एल या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तिलांजली देत मनमानी जागा व नाला मिळेल तिथे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला चुना लावल्या जात आहे कोरपणा व राजुरा तालुक्यातील अनेक नाल्यांमध्ये सीमांकन केले नाही नियमाप्रमाणे पंचनामे व घटनास्थळ लिहिलेले नाही तसेच केंद्र शासनाच्या मूळ मार्गापासून उत्खनन करण्याबद्दल दिशा निर्देश निश्चित केलेले आहे असे असताना मात्र जी आर आय एल कंपनी मंजूर क्षमतेपेक्षा लाखो ग्रास मुरूम रेती दगड उत्खनन करून संबंधित क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन झालेल्या रॉयल्टीचा भरणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे बंधनकारक असताना कुठलाही अहवाल 30 दिवसात तहसीलदारांना दिलेला नाही तसेच सूर्योदय सूर्य असतं या वेळेतच उत्खनन करावे असे आदेशात नमूद आहे मात्र ही कंपनी गेल्या 22 दिवसापासून कोरपणा तालुक्यातील देवघटनाल्यावर 75 12 ची परवानगी असताना दोन लाख ब्रास माती मुरूम उत्खनन करून बनसोड येथे पारडी बारा किलोमीटर क्षेत्रामध्ये दोन पोकलेन पोकलेन व 20 ते 22 ट्रकच्या माध्यमातून रात्रंदिवस उत्खनन करीत आहे याबाबतच्या तक्रारी देखील खाली कर्म विभागाला देण्यात आलेले आहे मात्र खरी कर्म विभाग डोळ्यावर पट्टी बांधून कंपनीला चोरी करण्याची मुभा दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या भागातील उत्खननाबद्दल अटी शर्ती भंग व नियमबाह्य उत्खनन झाल्याने शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे याबाबत जिल्हाधिकारी संपूर्ण नाल्यांची चौकशी करून कंपनीवर कारवाई करणार का असा सवाल सुज्ञ नागरिक विचारू लागले आहे पांढरपणी या गावाजवळ 15 ते 20 हायवे ट्रकने रेतीचे ढगकॉल वासरी जवळ टाकलेले असून त्याचा वापर रस्ते कामासाठी केल्या जात आहे गरीब व सामान्य नागरिकांना एक ट्रॅक्टर वाहनावर लाखो रुपयांचा दंड आकारणारा महसूल विभाग मात्र कंपनीच्या लाखो ब्रास रीती उपशावर गप्प का असा सवाल महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page