Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा
spot_img

बोमनवार विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान स्पर्धा

चामोर्शी – अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार शाखा – चामोर्शी तर्फे जा. कृ.बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा नुकतीच घेण्यात आली. भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे या उद्देशाने वर्गनिहाय पुस्तके देण्यात आली. या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बोमनवार विद्यालयाचे वर्ग 5 ते 11 चे एकूण 125 विद्यार्थी उपस्थित होते.

केंद्र संचालक म्हणून प्रभारी प्राचार्य ईतेंद्र चांदेकर परीक्षा पर्यवेक्षक म्हणून सहाय्यक शिक्षक घनश्यामं मनबत्तूलवार , प्रवीण कन्नाके, प्रा.खुशाल कापगते, सहाय्यक म्हणून गायत्री परीवांराचे श्री सावसागळे, श्री राजेशजी बाळराजे, नरेंद्रजी कोत्तावार यांनी काम पाहिले.

परीक्षेच्या यशस्वीतेसाठी स. शि. घनशाम मनबत्तूलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page