Sunday, February 25, 2024
HomeUncategorizedचामोर्शी तालुक्यातील मूलभूत समस्या केंव्हा सोडवणार ? (ज्येष्ठ नागरिक रमेश पालारापवार यांचे...
spot_img

चामोर्शी तालुक्यातील मूलभूत समस्या केंव्हा सोडवणार ? (ज्येष्ठ नागरिक रमेश पालारापवार यांचे मुख्यमंत्र्याना पत्र)

चामोर्शी:- तालुका निर्माण होऊन चाळीस वर्षे होऊन गेली परंतु तालुक्यातील समस्या जशाच्या तशाच आहेत. चामोर्शी तालुक्याचा मूलभूत विकास झाला नाही. तालुक्यातील समस्या केंव्हा सोडवणार व विकास कामांना सुरुवात केंव्हा करणार असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक रमेश पालारपवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे. ज्येष्ठ नागरिक रमेश पालारपवार यांनी मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले असल्यामुळे आपणास येथील समस्यांची जाणीव आहे. आता मुख्यमंत्री झाल्याने या आदिवासी व दुर्गम भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दक्षिणेची काशी समजल्या जात असलेल्या मार्कंडेश्वराची दुरावस्था झाली असून तिथे बंद पडलेली विकास कामे त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. तेथील मंदिर समूहाचा जीर्णोद्धार तातडीने करणे गरजेचे आहे. पुढील दोन-तीन महिन्यात तिथे खूप मोठी यात्रा यात्रा भरणार असल्याने यात्रेपूर्वी भाविकांसाठी व यात्रेकरूंना पूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. भावकांची राहण्याची व प्रसाधनाची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच चामोर्शी तालुक्यातील बेरोजगारी लक्षात घेता नवीन उद्योजकांच्या सुविधेसाठी एमआयडीसी उभारण्यात यावी,आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हारुग्णालयाची कित्येक वर्षा पासून होत असलेली मागणी तात्काळ पूर्ण करणे, युवकांना व विध्यार्थ्यांना क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल निर्माण करणे, शेतीला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून चीचडोह ब्यारेजवर उपसा सिंचनाची व्यवस्था करणे, चामोर्शीच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पाणी पोहोचत नाही त्यासाठी विशेष यंत्रणा उभी करणे,उच्च शिक्षणाच्या सोयीचे दृष्टीने शासकीय विज्ञान महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणीक सोयी- सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. पन्नास वर्षे पासून सूरू असलेली चामोर्शी-चंद्रपूर बससेवा बंद असून ती पूर्ववत सुरू करणे अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची गरज आहे. चामोर्शी तालुका अनेक वर्षांपासून विकासाची वाट पहात आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर चामोर्शी तालुका सारख्या अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त प्रभावित भागाचा विकास कराल अशी अपेक्षा पत्राच्या शेवटी रमेश पालारपवार यांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page