Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरमाजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे सह चार व्यक्तींवर जादूटोणा प्रतिबंधक अंतर्गत...
spot_img

माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे सह चार व्यक्तींवर जादूटोणा प्रतिबंधक अंतर्गत गुंन्हा दाखल

राजुरा शहरातील जादूटोणा प्रकरण
बादल बेले राजुरा :-शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीपुर्वी या निवडणूकीत आपल्याला सत्ता मिळावी, या लालसेपोटी संस्थेतील संचालकाने आपल्या नातलग व्यक्तींना सामिल करीत अन्य संचालकांच्या घरी जाऊन सोफ्यात काळा धागा बांधून हळद, कुंकू लावून काही अवांछनीय वस्तू ठेवल्या. हे संचालक सायंकाळी घरी गेल्यानंतर या बाबींची वाच्चता होताच व काही लपवून ठेवलेल्या वस्तू निदर्शनास आल्याने सर्वच घाबरून गेले. उपलब्ध सीसी टीव्ही वर हा सर्व प्रकार उघडकिस आला. या अंधश्रध्देला खतपाणी देणा-या प्रकाराविषयी संस्थेच्या चार अविनाश जाधव,डा एस एम वरकड,सचिन येगिनवार,प्रा.बी.यू. बोर्डेवार यांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आज राजुरा पोलिस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 0594 नुसार माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे ,प्रा.मयुरी नलगे,शिक्षिका शिल्पा भुते,आणि अभिजित भुते यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3(1),3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित करण्यात येतात. या संस्थेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त, चंद्रपूर यांच्या आदेशाने दिनांक 15 आक्टोंंबर 2023 ला निवडणूक घेण्यात आली. सीसी टिवी मुळे बिंग फुटले. यानंतर या संचालकांनी घरी येणा-यांना विचारले असता त्यांनी एका संचालकाच्या सांगण्यानुसार वस्तू ठेवल्याची कबूली दिली. पोलिस तक्रारीत सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकाॅर्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत .चार शिक्षित व्यक्तींवर गूंन्हा दाखल झाल्यामुळे शहरात खरबळ माजली आहे पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी,आणि जोशी करीत आहे

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page