Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरआदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना शहरी भागात सुरू करा--आमदार सुभाष धोटेंची...
spot_img

आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना शहरी भागात सुरू करा–आमदार सुभाष धोटेंची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा (ता. प्र) :– चंद्रपूर जिल्हयात नगर परिषद व नगर पंचायत अस्तित्वात असून प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात जवळपास 50 हजार लोकसंख्येच्या वर नागरिक वास्तव्यास आहेत. शहराचे ठिकाणी सर्व जाती धर्माचे नागरिक वास्तव्यास असून सर्व जाती धर्मीयांसोबत अनुसूचित जमातीचे सुद्धा नागरिक वास्तव्यास आहेत, शहरी भागात इतर विभागाच्या अनके योजना कार्यान्वीत आहेत, मात्र शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरिता अजूनही आदिवासी विकास विभागाची शबरी घरकुल योजना सुरु करण्यात आलेले नाही, त्यामुळे शहरी भागात राहणारे अनुसूचित जमातीचे गोर – गरीब नागरिक घरकुला पासून अजूनही वंचित आहेत.
ज्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाची रमाई घरकुल योजना शहरी भागात राबविल्या जाते त्याच धर्तीवर शहरी भागातील अनुसुचित जमातीच्या गोर – गरीब नागरिकांसाठी घरकुल योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाची शबरी घरकूल योजना शहरी भागात सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page