Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शी४ टक्के वाढीव महागाई भत्ता द्या - संतोष सुरावार
spot_img

४ टक्के वाढीव महागाई भत्ता द्या – संतोष सुरावार


चामोर्शी:-
केंद्र शासनाप्रमाणे १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता आदेश निर्गमित करावा, अशी मागणी शिक्षक परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत अद्यापही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. दिवाळी सारखा मोठा महत्त्वपूर्ण सण पुढील महिन्यात येत आहे. दिवाळीपूर्वी लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या आशेने शासन निर्णयाची प्रतीक्षा करित आहेत. केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२३ पासून ४ टक्के शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही १ जुलैपासून ४
टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याब शासन आदेश निर्गमित करून दिवाळी सदर आर्थिक लाभ जुलै महिन्यापासू थकबाकीसह मिळवून द्यावा, अशी मा निवेदनाद्वारे करून नागपूर विभागाचे माजी शिक्षक आ. नागो गाणार यांनीही निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. लाभाबाबत शासन निर्णय तत्काळ निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार तसेच माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग यांनी शासनाकडे केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page