Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीवाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
spot_img

वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी


चामोर्शी:- शहरातील मध्यभागी असलेल्या ढिवर ,केवट समाजाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये जुनी मच्छी मार्केट जवळ असलेल्या महर्षी वाल्मिकी चौकात येथे असलेल्या वाल्मिकी मंदिरात केवट , ढिवर व भोई समाजाचे आराध्य दैवत श्री रामायन ग्रंथाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती केवट मोहल्ला यांचे वतीने समाज प्रबोधन , सास्कृतिक कार्यकम , पालखी , महाप्रसाद अशा मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली .
यानिमित्ताने समाज प्रबोधन , या दोनदिवशीय कार्यक्रमात दि . २७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना ,पूजाअर्चा ,आरती , व सांयकाळी ६ .३० वाजता कालापथक , समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी केले . तर अध्यक्ष स्थानी माजी गटविकास अधिकारी पी जे . सातर हे होते . प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , माजी महिला बालकल्याण सभापती मंदा सरपे , मंडळ अधिकारी सुभाष सरपे , प्रबोधनकार सुनिल कुमार शेंडे, मदन चावरे , महेश शिंदे , सुरेश गद्दे , कान्हु कोसमशिले , राजु राऊत , उपस्थित होते . दि . २८ ऑक्टोबर रोजी भजन , गोपाळकाला करून विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन सकाळी १० वाजता ढोलताशाच्या गर्जरात महर्षी वाल्मिकी यांची पालखी काढण्यात आली . पालखीत कलश धारी मुली व महिला ,महर्षी वाल्मीकी , लव – कुश व माता सिता यांची ट्रॅक्टर वरून झॉकी काढून पालखीची सुरुवात वाल्मीकी चौक , शिवाजी चौक , मुख्य बाजारपेठ ते माता चवडेश्वरी चौक तेलगपुरा , राममदिर , माता मंदिर येथे फिरून वाल्मीकी चौक येथे पालखीचे विसर्जन करण्यात आले’ . यावेळी संदिप शिंदे , विशाल कस्तुरे , नारायण कस्तुरे , शंकर मंडरे , अक्षय राऊत , मच्छिद्र सातारे , रामचद्र भलवे , मधुकर गेडाम , सागर चापले , विलास सरपे ‘महादेव कोसमशिले , अमित सातारे , संजय शिंदे ,सुमित्रा शिंदे , गयाबाई राऊत , वनमाला सरपे , संध्या शिंदे ,मंदा मंडरे , कुन्ता कोसमशिले , शशीबाई सातारे आदि केवट , ढिवर , भोई समाजातील महिला व पुरुष बहुसंख्येने पालखीत सहभागी झाले होते.
तसेच महर्षी वाल्मिकी जयंती व कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून महर्षी वाल्मिकी चौकात असलेल्या सभागृहात भूलाई मातेची घटस्थापना दि . २९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. ही परंपरा अनेक वर्षापासून समाजबांधव जोपासत आहेत .
यावेळी केवट, ढिवर भोई समाजातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते तर श्री दुर्गा साई भजन मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला . सांयकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .या कार्यक्रमासाठी समाजातील युवकांनी अथक परिश्रम घेतले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page