Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरचनाखा गावात दिवसाढवळ्या दीड लाखाची चोरी.
spot_img

चनाखा गावात दिवसाढवळ्या दीड लाखाची चोरी.


राजुरा प्रतिनिधी:-
विरुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चनाखा गावात दिवसाढवळ्या दीड लाखाची चोरी करण्यात आली आहे. तक्रारीवरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चनाखा गावात दिनेश रामटेके यांचे विहिरगाव रस्त्यावर घर आहे. दि २६ ऑक्टोबर ला दिनेश शेती साठी मोटार पंप घेण्यासाठी मुल ला गेले होते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेतात गेली. घर कुलूपबंद असल्याची संधी साधून चोरट्यांने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व आलमारीमधील एक लाख रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या, नथ, पोत व चांदीच्या पायपट्या असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.दिनेश यांची मुलगी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, याअगोदर सुध्दा त्यांची घरी कापसाची चोरी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चोर हा गावातील असल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरमालक दिनेश रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरुर पोलिस करीत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page