Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरहातचे सोयाबीन गेले, मदतही मिळेना--------------------------------बीआरएसने पेटविली सोयाबीनची होळी.
spot_img

हातचे सोयाबीन गेले, मदतही मिळेना——————————–बीआरएसने पेटविली सोयाबीनची होळी.

राजुरा 23 ऑक्टोबर:-

नगदी पीक असलेलं सोयाबीनवर पिवळा मोझाक रोगाने आक्रमण केले. डोळ्यादेखत सोयाबीन पीक उध्वस्त झाल. मदतीचा बळीराजा माय बाप सरकारकडे डोळे लावून होता. मात्र अद्यापही मदतीचा नावाने बळीराजाचे हात रिकामेच आहे.सरकारवर बळीराजा संताप व्यक्त करीत आहे. अश्यात बळीराजाचा सोबत बीआरएसचे भूषण फुसे खंबीरपने उभे झालेत. बळीराजाना सोबत घेत त्यांनी सोयाबीन पिकाची होळी पेटविली.

निसर्गाचा लहरीपणामुळे बळीराजा संकटात सापळाला आहे. यामुळ बळीराजा डोक्यावर आर्थिक संकटाचे वाहत आहे. अशा स्थितीत सरकारनं मदतीचा हात पुढे करायला हवं होतं, ही माफक अपेक्षा बळीराजाची आहे. मात्र बळीराजाचे हात कोरडेच आहेत. कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे पिवळा मोजक रोगाने मोठे नुकसान झाले.अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात गुरढोर सोडलीत. तर काहींनी उभ्या पिकात ट्रॅक्टर लावली.जिल्ह्यात ६७.७६६ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यापैकी ५३ हजार हेक्टर म्हणजेच जवळपास ८० टक्के सोयाबीन पिकावर पिवळा मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला.शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याना आर्थिक पॅकेज जाहीर करून त्यांच्या बँक खात्यात त्वरित पैसे जमा करण्याची मागणी घेत बीआरएसने मोर्चा काढला.राजुरा शहारात सोयाबीन पिकाची होळी केली. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page