Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरमराठा सेवा संघ राजुरा तर्फे डॉ. लीना येवले हिचा सत्कार
spot_img

मराठा सेवा संघ राजुरा तर्फे डॉ. लीना येवले हिचा सत्कार

राजुरा- मराठा सेवा संघ शाखा राजुराच्या वतीने लीना येवलेचे तिच्या राहत्या घरी जाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या 2022 च्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक या परीक्षेत डॉ. लीना विठ्ठलराव येवले हिने बाजी मारली. तिचा महाराष्ट्र राज्यातुन 159 वा तर महिला मधून 34 वा क्रमांक आला आहे. लीना ही राजुरा येथील विठ्ठलराव व इंदिराताई येवले या सामान्य कुटुंबात जन्मलेली व आपल्या जिद्दीने व अभ्यासू वृत्तीने या पदापर्यंत पोहोचलेली आहे. वडील विठ्ठलराव हे छोटीशी ऑईल मिल चालवत असून आई इंदिराताई येवले या राजुरा येथील जिजामाता कन्या विद्यालय येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. लिनाचे प्राथमिक शिक्षण राजुरा येथील स्टेला मॉरिस कॉन्व्हेन्ट येथे तर ११, १२ वीचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे झाले. BVSC नागपूर येथे तर MVSC उदगीर येथील नामांकित महाविद्यालयातून पूर्ण केले. नंतर एमपीएससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक या पदाला गवसणी घातली. या क्षेत्रात खुप संधी आहे. हे क्षेत्र खुप चांगले आहे. तुम्हाला मानसिक व शारीरिक तयारी ठेवावी लागेल. हे क्षेत्र निवडल्यावर तुमचा तुम्हालाच अभिमान वाटेल असे तिने सांगितले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक व नातेवाईक यांना दिले. धनगर समाजातून लीना ही पहिलीच अधिकारी झाल्याने समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिनेश पारखी, जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे, बळीराजा नागरी सहकारी पतसंस्था राजुराचे अध्यक्ष विजय मोरे, मधुकर डांगे, संभाजी साळवे, बाबुराव मुसळे, पुरोगामी विचार मंचचे ॲड. मारोती कुरवटकर, अमोल राऊत, सुरेंद्र फुसाटे व धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी पुंडलिक उराडे, कैलाश उराडे, सुधीर घुरडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page