Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरप्राध्यापकांनी सादर केला शिवाजी महाराजांचा पोवाडा
spot_img

प्राध्यापकांनी सादर केला शिवाजी महाराजांचा पोवाडा

राजुरा प्रतिनिधी:- श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे नुकतीच गुणात्मक दर्जा तपासण्याकरिता राष्ट्रीय प्रमाणीकरण व मूल्यांकन परिषद बेंगलोर येथील तीन सदस्यीय समितीने भेट दिली, या भेटीदरम्यान विविध विभाग, विविध सेल, प्रशासन या सर्व विभागाना भेट देत महाविद्यालयाचे मूल्यांकन केले, यावेळी झालेल्या सांस्कृतिक संध्यामधे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थांनी लोकनृत्य, गोंधळ असे वेगवेगळे प्रकार करून उस्पथितांची मने जिंकली, या सांस्कृतिक संधेमध्ये एक पोवाडा सादर झाला आणि त्याचे एक वैशिष्ट्ये म्हणजे त्यात फक्त महाविद्यालयाचे प्राध्यापक सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्ती वर आधारित अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला, आणि उपस्थितांची वाहवा मिळविली. दरवर्षी दरवेळेस विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच आणि प्राध्यापक बघ्यांच्या भूमिकेमधे असतो, यावेळी मात्र काही प्राध्यापक पुढे येत आपलाही सहभाग दाखविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रा. डॉ. संजय शेंडे, अफजलखानाच्या भूमिकेत प्रा. गुरुदास बल्की, माँ जिजाऊच्या भूमिकेत डॉ. चेतना भोंगाडे, बडी बेगमच्या भूमिकेत डॉ अनिता रणधीर, रायबा च्या भूमिकेत डॉ राजेंद्र मुद्दमवार, जिवा महालाच्या भूमिकेत प्रा महेश गेडाम, सय्यद बंडा च्या भूमिकेत प्रा मलिक काझी यांनी भूमिका सादर केली तर बॅकग्राउंड मधे कु कशीश भोंगळे, संजीवनी राऊत, अतुल देहारकर, पवन चिंतलवार यांनी पोवाडामध्ये सहभाग घेतला.
हा पोवाडा सादर करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. वारकड यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page