Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूर22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव.
spot_img

22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव.


राजुरा प्रतिनिधी:-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी श्री हनुमान मंदिर देवस्थान, जुने बस स्थानक राजुराच्या पटांगणात संपन्न होणार आहे . ह्या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून संस्कार भारतीचे अखिल भारतीय संयोजक आशुतोष अडोनी राहणार नागपूर हे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड उपस्थित राहनार आहेत. ह्यावेळी संघ स्वयंसेवकांचे शहराच्या मुख्य मार्गावरून पथसंचलन होणार आहे . तरी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजुरा तालुका संघचालक राजेंद्र येनुगवार, नगर कार्यवाह महेश समर्थ यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page