Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीलोहखनिज वाहतूकीची परवानगी जिल्ह्यातील सर्व ट्राॅन्सपोर्टना क्रमवार देण्यात यावी--पत्रकार परिषदेतून गडचिरोली जिल्हा...
spot_img

लोहखनिज वाहतूकीची परवानगी जिल्ह्यातील सर्व ट्राॅन्सपोर्टना क्रमवार देण्यात यावी–पत्रकार परिषदेतून गडचिरोली जिल्हा ट्राॅन्सपोर्टर संघटनेची मागणी…


तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकच पार्कींग स्टाॅक देऊन लोहखनिज वाहतूक व्यवस्था करावी….. न्याय न मिळाल्यास जिल्हा ट्रान्सपोर्टर संघटना आष्टी येथे चक्काजाम आंदोलन करणार.वनवैभवाने नटलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख असुन या जिल्ह्यात लोहखनिजाचे मोठ्या प्रमाणात वलय आहे अशातच मागील दोन वर्षांपासून सुरजागड पहाडी वरुन लोहखनिज काढण्याचे काम सुरू झाले असून त्या मालाची वाहतूक करणाऱ्या करीता जिल्हातील सर्व ट्रान्सपोर्टरनां क्रमवार देण्यात यावे.अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केलेली आहे. विशेष म्हणजे या लोहखनिजांची वाहतूक चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लाॅयन मेटल आणि एनजी प्रकल्पात व जिल्हा बाहेरील मानिकगड,बल्लारशा, केळझर येथे दररोज हजारो टन ट्रकच्या माध्यमातून केली जात आहे.पंरतु आलापल्ली,अहेरी, एटापल्ली भागातील ट्राॅन्सपोर्टर वगळता जिल्ह्यातील इतर ट्राॅन्सपोर्टरनां वाहतूकी करीता पाहिजे त्या प्रमाणात काम मिळत नसल्याने तिन- चार दिवस ट्रक केवळ नंबर लावण्यासाठी उभे ठेवावे लागते. त्यामुळे घेतलेले बॅकेंचे कर्ज, ड्रायव्हरचा पगार,व कुटुंबाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे.याबाबत संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच आमदार, खासदार व मंत्रीमहोदयाकडे चर्चा करण्यासाठी गेले असता बोलायला तयार नाही, मात्र अहेरी, एटापल्ली, तालुक्यातील ट्रान्सपोर्टरनां विशेष सवलत देऊन सरळ लोड देण्यात येत आहे.मग आमच्यावरच अन्याय का ? हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल असे सांगण्यात आले.मग दुजाभाव का केला जात आहे. त्यामुळे आम्ही मा.जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन न्याय मागण्यासाठी विनंती केली आहे.तेव्हा जिल्हातील स्थानिक ट्रान्सपोर्टरनां कंपनीच्या खमनचेरु पार्कींग मध्ये नंबर न लावता आम्हाला मद्दीगुड्डम स्टाॅक यार्ड मधुन नंबर लावुन लोड करुन देण्याची व्यवस्था करावी.अन्यथा येत्या काळात गडचिरोली जिल्हातील ट्राॅन्सपोर्टर संघटना आष्टी येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निकेशभाऊ गद्देवार, महादेव थोरेवार, नेताजी गुळंकवार, संतोष येंबडवार, दीपक गुंफलवार, मधुकर चिंतलवार, रविंद्र येंबडवार, राकेश शर्मा, साईबाबा गोडसेलवार, अमोल पवार,मिहिर डे,गुड्डू नागुलवार, अंकुश मंडल,रुषीकेश देवनाथ, अनिल खोब्रागडे, संजय नंदी,मनोज मालाकार,अमीत राॅय, सुकुमार मंडल, आदी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page