Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीप्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र आष्टी ऑनलाइन उद्घाटन.
spot_img

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र आष्टी ऑनलाइन उद्घाटन.

आष्टी –कौशल्य, उद्योजक, नाविन्यता आणि रोजगार विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.19/ 10/ 2023 रोजी ठीक सायंकाळी 4 वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, ना. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी आष्टी येथील सरपंच बेबीताई बुरांडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, विस्तार अधिकारी श्री. बोरकुटे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. चितमवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, मा. दिवाकर कुंदोजवार , संचालक अतुल फुलझेले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील विविध 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र यांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र अंतर्गत राबविणाऱ्या स्कील डेव्हलपमेंट कोर्सची महिती उपस्थितांना देण्यात आली.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page