Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीना.धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात
spot_img

ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समक्ष धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी केले केक कापून वाढदिवस साजरा

सिरोंचा:- कर्तव्यदक्ष आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजेता चेहरा म्हणजे मा.ना.धर्मरावबाबा आत्राम कॅबिनेटमंत्री(अन्न व औषधी प्रशासन)महाराष्ट्र राज्य हे सकाळी शासकीय कार्यक्रमानंतर त्यांच्या स्वतःच्या मोटारीने राजरजेश्वरी फंक्शनहाल येथे आले. व त्यानंतर वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी नामदार धर्मराव बाबा आत्राम मार्गदर्शनात सांगितले की आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामे करावी जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी झाला पाहिजे. ते पुढे म्हणाले मला आजचा दिवस हा खूप आनंद वाटत आहे.माझ्या जनता व कार्यकर्त्यां समक्ष वाढदिवस साजरा होतोय यापुढेही असेच आशीर्वाद जनतेचं आणि कार्यकर्त्यांचा असावेत ही अपेक्षा आहे असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.पुढे ते म्हणाले की,यंदा विधानसभा निवडणुकीत माझी लाडली मुलगी जिल्हापरिषद माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई रिंगणात असणार आहे.मला जे प्रेम आशीर्वाद दिले ते माझ्या मुलीला हवेत.असे म्हणाले.उपस्थित मंचावर जेष्ठ कार्यकर्ते चंद्रय्याजी राल्लाबंडीवार, पेटारामा तलांडी,.भंडारी सम्मय्या,.वेंकटस्वामी मारगोनी, नागेशराव गागापुरपूवार, नागरेड्डी गुडीमेटला, विश्वेश्वराव kondra, बालय्या सिरबाईना,सत्यनारायण मंचालवार,दामोदर ओल्लाला,चकीनारपु सावकार,यांचाही आभार मानले. यावेळी सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page