Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
spot_img

चामोर्शी येथे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

आरोग्यवर्धिनी केंद्रातून नागरिकांना मिळणार मोफत औषध उपचार
चामोर्शी – चामोर्शी येथे आज दिनांक २० ऑक्टेबर रोजी मुख्य बाजार पेठ येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जयश्रीताई वायलालवार नगरपंचायत अध्यक्ष, म लोमेश बुरांडे नगरपंचायत उपाध्यक्ष , भाजपाचे सुरेश शहा , दिलीप चलाख , साईनाथ बुरांडे ,प्रतीक राठी ,श्रीकांत फागनेकर मुख्याधिकारी नगरपंचायत , पोलीस निरीक्षक. विजयानंद पाटील , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. बिधान देवरी , .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रफुल हुलके तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी यांनी केले. शहरी आरोग्य केंद्रामध्ये लोकांना मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, आबा कार्ड ,आयुष्यमान कार्ड , सोई सुविधा इत्यादी मोफत सुविधा दिल्या जाणार आहे . कार्यक्रमाचे संचालन गोविंदा कळस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार मंगर यांनी केले. यावेळी गावातील नागरिक , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page