Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरयेल्लो मोझाकने बळीराजाचा डोळ्यात पाणी : नेते मात्र राजकारणात व्यस्त
spot_img

येल्लो मोझाकने बळीराजाचा डोळ्यात पाणी : नेते मात्र राजकारणात व्यस्त

चंद्रपूर प्र.:-जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं. सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला होती.मात्र अद्याप साधे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा भारत राष्ट्र समितीने निषेध नोंदवीला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण फुसे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्या गेली .त्यापैकी जवळजवळ 53 हजार हेक्टरवरील सोयाबीनवर येल्लो मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नगदी पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.येल्लो मोझाकचा प्रादुर्भाव जिल्हात ऑगस्टमध्ये आढळला होता. त्यानंतर यावर उपाययोजना करायला हवं होतं. मात्र महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे वेळेत उपाय झाले नाहीत.त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले.सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला आहे. मात्र अद्याप सोयाबीन शेतीचे साधे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन उदासीन आहे.शेतकरी विरोधी असलेल्या शासन व प्रशासनाचा भारत राष्ट्र समितीने जाहीर निषेध केला आहे. तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करा अशी मागणी यावेळी भारत राष्ट्र समितीने केली आहे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पीडित शेतकऱ्यांसोबत मिळून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. याप्रसंगी भारत राष्ट्र समिती राजुरा महिला समन्वयक ज्योतीताई नळे, नळे सर, राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, धनंजय बोर्ड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page