Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी व निबंध स्पर्धा घेवून वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा
spot_img

देवतळे महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी व निबंध स्पर्धा घेवून वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा

चामोर्शी- येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात प्राचार्य डाॕ. डी.जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनात देशाचे माजी राष्ट्रपती डाॕ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा घेवून साजरी करण्यात आली. यावेळी डाॕ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय लागावी आणि लेखन कौशल्याचा विकास व्हावा, वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनीचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
‘भारताच्या उत्तुंग वैज्ञानिक प्रगतीत डाॕ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे योगदान.’ ह्या विषयावर विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथाचे वाचन केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना डाॕ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांविषयी ओळख करून माहिती देण्यात आली. तसेच ग्रंथालयातील विविध पुस्तकांचा परिचय सुद्धा विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देण्यात आला.
मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून सुंदर सुवाच्छ अक्षरात निबंध लिहून ५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ठ निबंधाला प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देऊन प्राचार्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली..
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय प्रमुख डाॕ. भूषण आंबेकर. संस्कृतिक व मराठी विभाग प्रमुख प्रा. मनिष राऊत, सहयोगी प्रा. वैभव म्हस्के, प्रा. रोशन गेडाम तसेच उपस्थित प्रद्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page