Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीआरोग्य हीच खरी धनसंपत्ती-- रीना सरकार
spot_img

आरोग्य हीच खरी धनसंपत्ती– रीना सरकार

आष्टी प्रतिनिधी:- कोणत्याही राष्ट्रांनी कितीही आर्थिक प्रगती केली असली तरी त्या राष्ट्रातील सामान्य जनता जर आरोग्याने सुदृढ नसेल तर त्या प्रगतीला कोणताही अर्थ राहत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आरोग्य या खऱ्या संपत्तीकडे लक्ष द्यावे असे आव्हान रीना सरकार नोवा स्टिक आरोग्य परिवार यांनी विद्यार्थ्यांना केले. महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग, महिला अध्ययन व सेवा केंद्र, विद्यार्थी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात आरोग्य हीच खरी धनसंपत्ती यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रीना सरकार यांनी सिकलसेल, मोतिया बिंदू, कुष्ठरोग, मलेरिया व विशेष करून युतीच्या युवा अवस्थेतील होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक समस्या यावर विशेष प्रात्यक्षिक मार्गदर्शन करून चित्रांद्वारे, विविध प्रश्न उत्तरा द्वारे विद्यार्थ्यांना शरीर कसे सुदृढ करावे त्याबाबतीत आहार, व्विहार, योगा, सकारात्मक विचार, वाचन अशा विविध मार्गद्वारे आपल्याला सुदृढ आरोग्य तयार करून राष्ट्राची सेवा करता येते आणि म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसन यापासून दूर राहून राष्ट्राची सेवा करावी असे आवाहन केले या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भारत पांडे यांनीही उदाहरण देऊन सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती याकरिता विद्यार्थ्यांनी शीलवान चरित्र बनवावे असे आवाहन केले यावेळेला प्रा.नाशिका गबने, प्रा. सालूलकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर श्रावणी ताडशेट्टीवार यांनी कार्यक्रमाचे आभार केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page