Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरविभागीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता आदर्श शाळेचा संघ सज्ज.
spot_img

विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता आदर्श शाळेचा संघ सज्ज.

गोंदिया येथे होणार 17 ऑक्टोबर ला विभाग स्तरावरील कबड्डी चे सामने. 14 वर्ष आतील वयोगटाचे चंद्रपूर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व.

  • राजुरा 13 ऑक्टोबर:
  • बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विध्यार्थीनी 14 वर्ष आतील वयोगटात विभाग स्तरावर निवड झाली असल्याने 17 ऑक्टोबर ला गोंदिया येथे सामने खेळायला हा संघ सज्ज झाला आहे. राजुरा तालुका नंतर चंद्रपूर जील्हास्तरावर प्रथम क्रमांक घेत विभाग स्तर गाठला असून आपली विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर, क्रीडा मार्गदर्शक बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश आमनार यांच्या नेतृत्वाखाली या विध्यार्थी ची वीजयी दौड सुरू आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राजुरा तालुक्यातून चौदा वर्ष आतील वयोगटातून आदर्श शाळेतील यश कुळमेथे , जय पेटकर, संकेत मोहितकर, जय इंगोले, शिवम देवाळकर, आर्यन वांढरे, लोकेश वडस्कर,हर्षद बरडे, ध्रुव वाटेकर, चेतन मत्ते, सुजल बोटपल्ले, कपिल उरकुडे या विध्यार्थीनी कबड्डी स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविले आहे. गोंदिया येथे होणाऱ्या विभाग स्तरावरील कबड्डी खेळा करीता रवाना होणाऱ्या या संघाला संस्थेचे संचालक तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्कर येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक लक्ष्मणराव खडसे, मधुकर जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापीका नलीनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर,राजुरा तालुका क्रीडा समन्वयक हरिश्चंद्र विरुटकर , शालेय क्रीडा विभागातील शिक्षक विकास बावणे, जयश्री धोटे, भाग्यश्री क्षीरसागर, वैशाली चिमुरकर यासह सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी या विध्यार्थीना स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page