Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयाचे एक पाऊल महिला स्वयंसंरक्षणाकडून.. सक्षमिकरणाकडे…
spot_img

देवतळे महाविद्यालयाचे एक पाऊल महिला स्वयंसंरक्षणाकडून.. सक्षमिकरणाकडे…

चामोर्शी :- येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सध्याच्या आधुनिक काळात महिला, मुलींवर सतत होणारे हल्ले,अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला घाबरून न जाता त्या परिस्थितीला धैर्याने, आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयीन महिला मार्गदर्शन समितीच्या वतीने मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे दिले गेले.
कार्यक्रमात विद्यार्थीनींना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु.अक्षता लांबाडे व सहाय्यक कु.सानिका दुर्गे, कु.रिया वाट यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कराटे प्रशिक्षणाचे धडे घेऊन आपले स्वसंरक्षन करुन विद्यार्थिनींनी स्वतःला सिद्ध करावे. पुढे उभ्या असलेल्या वाईट परिस्थितीला, प्रसंगाला खंबीरपणे, हिंमतीने सामोरे जाऊन प्रतिकार केला पाहिजे. कराटे फक्त माहितीपुरते किंवा शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता ते आत्मसात करून आपल्या दैनंदिन आयुष्यात वेळ आली तर त्याचा उपयोग सुद्धा करता आल पाहिजे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉ. डी.जी.म्हशाखेत्री यांनी व्यक्त केले केले..
महाविद्यालयातील विद्यार्थीनी खेड्यापाड्यातून दूरवरून प्रवास करून महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता येतात. अशा वेळेस वाटेत त्यांच्यावर काही कठिण प्रसंग ओढवला तर त्या प्रसंगाला तशा कठीण परिस्थितीला त्यांना तोंड देता यावे व दोन हात करून त्या परिस्थितीचा धैर्याने सामना करता यावा हा सर्वांगिण उदात्त हेतू प्रास्ताविकेतून महाविद्यालयीन महिला मार्गदर्शन समितीच्या प्रमुखं प्रा.वैशाली कावळे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त संचालक शारीरिक शिक्षण विभाग क.दा.दे. महाविद्यालय मा. संजय म्हस्के उपस्थित होते. सन्माननीय प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या वतीने कुमारी अक्षता लांबाडे यांचे सन्मानचिन्ह व महाविद्यालयाचे वार्षिक अंक सुगंध देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाला यशस्वीतेकडे नेण्यासाठी महाविद्यालयीन महिला मार्गदर्शन समितीच्या प्रमुखं प्रा.वैशाली कावळे , व सहाय्यक प्रा. म्हस्के मॅडम, प्रा. उसेंडी मॅडम, प्रा. शुभांगी खोबे, प्रा. जयश्री बोबाटे, प्रा. मिनल गाजलवार तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. डॉ.बावणे , प्रा. दिपक बाबणवाडे प्रा.अरुण कोडापे, प्रा. मनिष राऊत, प्रा. वैभव म्हस्के, प्रा.रोशन गेडाम, प्रा. संकेत राऊत, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page