Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूररोटरी क्लब व एन एन ग्लोबल चा सामाजिक उपक्रममुठरा येथे आरोग्य शिबीराचे...
spot_img

रोटरी क्लब व एन एन ग्लोबल चा सामाजिक उपक्रममुठरा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन


500 हुन अधिक नागरिकांचा सहभाग

राजुरा ता प्र.:- राजुरा तालुक्यातील मुठरा येथे रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व एन एन ग्लोबल प्रा. ली. इनिश भाटिया ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने आज दि.10 ऑक्टोबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला पाचशेहून अधिक नागरिकांचा सहभाग लाभला
मुठरा येथील जी.प.प्राथमिक शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराला सरपंच कार्तीक्षा बोबडे,उपसरपंच विश्रांती करमनकर, पोलीस पाटील जितेंद्र जीवने, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, सहसचिव मिलिंद बोडखे,एन एन ग्लोबल चे कोहिनुर करवाडे, प्रमोद छाबडा, किशोर जांगडे, अविनाश कावळे, प्रकल्प निर्देशक ड्रा अप्रतिम दीक्षित,ड्रा आसावरी देवतळे,रोटरी क्लब सदस्य तिखे सर,संतोष तेलंग,सचिन गांगरेड्डीवर, राजेश गाणारपवर, अजय पालरपवार आदी सह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते
एन एन ग्लोबल तर्फे ग्रामीण परिसरातील लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात 500 हुन अधिक लोकांनी तपासणी करून उपचारही केले यावेळी औषधीचे वाटपही करण्यात आले मेडीट्रीना हॉस्पिटल चे ड्रा.स्वप्नील हजारे,एच सी जि कॅन्सर हॉस्पिटल चे ड्रा.कमलजीत, ड्रा.सारंग,ड्रा.मंगेश गोरंटीवार,, ड्रा.आशिष बानोटी,ड्रा.तेजस दांडेकर,ड्रा.वेद सारंग आदींनी रुग्णाची तपासणी करून उपचार केले
अनेक तज्ञ डॉक्टर विविध व्याधीवर उपचारकरण्यासाठी रुग्णाची तपासणी करीत होते शिबिरात मुठरा व परिसरातील नागरिक पुरुष,स्त्री,लहान मुले यांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी ग्रामस्थांचे एन एन ग्लोबल तर्फे आभार मानले

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page