Saturday, February 24, 2024
Homeगडचिरोलीतुकुम घाटावर अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक्टर केले जप्त
spot_img

तुकुम घाटावर अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक्टर केले जप्त


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातील तुकुम घाटावर अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनिय बातमी मिळताच महसूल विभागाने धाड टाकून दिनांक 9/10/2023ला सायंकाळी टँकर जप्त केली.तालुक्यातिल हि दुसरी घटना असल्याने अवैध वाळू उपसा करणार्या तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तुकुम घाटातुन अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक MH33f 4823 असून ति जप्त केली असल्याचे समजते. महसूल विभाने यापुर्वीही कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे. गणेश बळिराम मोटघरे यांच्या मालकीची असून दंडात्मक कारवाई तहसीलदार ए. बी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. के. वाळके व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली . यावेळी मंडळ अधिकारी सरपे, नितीन नंदावार, कोतवाल हलामी उपस्थित होते . या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page