Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीचिंचोली गावातील लोक विविध समस्यांनी ग्रस्त
spot_img

चिंचोली गावातील लोक विविध समस्यांनी ग्रस्त

धानोरा तालुका प्रतिनिधी:-

धानोरा तालुक्यातील चिचोली हि स्वतंत्र असुन ग्रामपंचायत मध्ये अनेक समस्या असताना हि येथिल ग्रामपंचायत चे दुर्लक्ष असल्याचे गावकरी म्हणतात.देश अमृत महोत्सव साजरा करतोय इथे जायलाच चांगला आणि पक्का रस्ताच नाही. मुख्य रस्त्यापासून ते जेवलवाहि रस्त्यापर्यंत म्हणजे 150 मीटर चा रस्ता पूर्णपणे उघडलेला आहे. मोठमोठे दगड बाहेर निघालेले आहेत. अशा मार्गावरुन प्रवास करने म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.गावातिल दोन्ही बाजूच्या नाल्या पूर्णपणे भरलेल्या आहेत.अनेक वर्षापासून उपसल्याच नाहीत.तुंडुंब भरल्याने घरातील सांडपाणी हे नालीने न जाता रस्त्याने पाटाच्या पाण्यासारखे वाहत आहेत .काही ठिकाणी रस्त्यावरच गटार तयार झाली आहे. तसेच विहिरीजवळ सांडपाणी साचलेले आहेत.लोकांना शुद्ध पाणी न मिळता गटाराचे पाणी विहिरीला झिरपत असून त्या विहिरीचे पाणी पिण्याचे योग्य असेल का? आरोग्य खराब करन्यासाठी तेच पाणी पुरेसे असल्याचे पहायला मिळते. त्या विहिरीच्या पाण्यापासून अनेक रोगराईला आमंत्रण दिल्यासारखे होते.स्वच्छतेचा उपक्रम ग्रामपंचायत राबवते कुठे? काही भागात तर नालीच नाही. त्यामुळे घरातील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर राहत आहे. आणि इतरही समस्या आवासुन उभ्या आहेत .विद्युत या अनेक समस्या तातडीने सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page