Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीकर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात इंग्रजी विषयाची कार्यशाळा संपन्न
spot_img

कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात इंग्रजी विषयाची कार्यशाळा संपन्न


चामोर्शी: – स्थानिक कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात इंग्रजी अभ्यास मंडळाच्या वतीने इंग्रजी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अक्षय धोटे, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक पदावरून संबंधित करताना त्यांनी इंग्रजी भाषेचे जागतिक पातळीवरील महत्त्व यावर प्रकाश टाकला. इंग्रजी विषयात रस घेतला तर कसा सोपा होऊन विद्यार्थ्यांना त्यात अभिरुची निर्माण होऊन चांगले जीवन जगण्याचे कौशल्य साध्य होऊ शकते याची सुंदर उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.डी.जी.म्हाशाखेत्री सर, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य, डॉ. दौलतराव भोंगळे शिवाजी महाविद्यालय राजुरा जि. चंद्रपूर, प्रा.डॉ. सुदर्शन दिवसे प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपना जि. चंद्रपूर व महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दीपक बाबनवाडे उपस्थित होते.
यावेळी इंग्रजी अभ्यास मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश कुलेटी, सचिव सुजीता वाढई तर सदस्य कु. प्राचीता पिपरे, कु. पायल कुणघाडकर, अजय परचाके, कु. वैष्णवी सातपुते इत्यादी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कु. रिया सातपुते तर प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दीपक बाबनवाडे यांनी तर आभार कु.प्राचीता पिपरे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. आर डी बावणे, प्रा.डॉ.राजेंद्र झाडे, प्रा.डॉ. भूषण आंबेकर, प्रा. कोडापे,प्रा. गेडाम, प्रा. संकेत राऊत,प्रा,वैभव मस्के प्रा. मनीष राऊत,प्रा.कु. वंदना थुटे, प्रा. कु.गाजलवार, प्रा. कु.कावळे, प्रा.कु. बोबाटे,प्रा. कु. खोबे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page