Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीविमाशिच्या वतीने शिक्षक आमदार अड्बाले यांचा सत्कारअनेक संघटनांचे स्वीकारले निवेदन
spot_img

विमाशिच्या वतीने शिक्षक आमदार अड्बाले यांचा सत्कारअनेक संघटनांचे स्वीकारले निवेदन


चामोर्शी :- नागपूर विभाग मतदार संघाचे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात विमाशि चामोर्शीच्या वतीने शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
आमदार म्हणून नियुक्ती झाल्यापासून चामोर्शी विमाशी कार्यकर्त्यांना सत्काराची संधी प्राप्त झालेली नव्हती मात्र विज्युक्टाच्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने ते चामोर्शीला आले असता विमाशी पदाधिकारी यांचे वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . याप्रसंगी अनेक संघटनांचे समस्यांचे निवेदन आमदार अडबाले यांनी स्वीकारून त्यांना न्याय देण्यासाठी निश्चित तारीख देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .
याप्रसंगी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विमाशिचे कार्याध्यक्ष कैलास भोयर , सत्कारमूर्ती शिक्षक आमदार सुधाकर अटबाले ,प्रमुख अतिथी कार्यवाह तथा सिनेट सदस्य अजय लोंढे ,तालुका अध्यक्ष संजय कुनघाडकर , प्राध्या . धमेंद्र मुनघाटे , माजी सिनेट सदस्य सुनिल शेरकी , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कालिदास बनसोड , हास्यविनोद उंदीरवाडे, अतुल येलमुले, संजय आलेवार , विनोद सालेकर , गजानन बारसागडे , पोपेश्वर लडके , अरविंद कुनघाडकर , रवींद्र उराडे , प्रकाश मट्टे , सुवेंदू मंडल , संतोष बोडूकवार , अशोक सहारे , आणि विमाशीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार अडबाले म्हणाले की, मी माझ्या शिक्षक बांधवांसाठी व त्यांच्या समस्यांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत पुढे जाऊन आपणाला या सरकारच्या खाजगीकरण व नोकऱ्यांचे खच्चीकरण करून भावी युवक पिढीचे जगणे हिरावून घेण्याच्या प्रयत्नाला आंदोलनाद्वारे धुडकावून लावणे गरजेचे आहे . अन्यथा हे सरकार सामान्यांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही . त्यासाठी संघटनांची एकी फार महत्चाची असल्याचे ते म्हणाले . याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धीप्रमुख गजानन बारसागडे तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष संजय कुनघाडकर यांनी तर आभार पोपेश्वर लडके यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चामोर्शी तालुक्याच्या विमाशि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page