Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीविजाभज आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ निकाली काढा-----आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे...
spot_img

विजाभज आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ निकाली काढा—–आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे आ.अडबाले यांना निवेदनकुनघाडा रै :-
गडचिरोली जिल्ह्यातील विजाभज आश्रमाशाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी मागणी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक आ सुधाकर अडबाले यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सातव्या वेतन आयोगात एकस्तर लागू करण्यात येऊन, त्याचे फिक्षेशन शिक्षण विभाग व आदिवासी विभागानुसार करण्यात यावे, नवीन संचमान्यतेत गोठवण्यात आलेली मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची पदे पूर्ववत लागू करण्यात यावे, विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी योग्य पाठपुरावा करण्यात यावा, डिसीपीएस कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमाखर्चाच्या हिशोबात पावत्या दरवर्षी देण्यात यावे, समाजकल्याण कार्यालयात आश्रमशाळा संदर्भातील विविध समित्या रद्द करण्यात याव्यात, वैद्यकीय बिलाची मर्यादा ३ लाख पर्यंत जिल्हा स्तरावर ठेवण्यात यावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नती योजना ( २४/२० ) विनाअट लागू करावी, डीडीपीएस कर्मचाऱ्यांना एनपीएस अंतर्गत अदा करण्यात यावे, शिक्षक कर्मचाऱ्यांना अर्जित रजा लागू करून, त्यांचे रोखीकरण करण्यात यावे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्यात यावे व विलंब होत असल्यास उणे प्राधिकरणातुन करण्यात यावे, आदिवासी विकास विभागप्रमाणे ३ लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आ प्र योजना १०-२०-३० लागू करण्यात यावी यासह आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आश्रम शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे यांच्या नेतृत्वात शिक्षक आ सुधाकर अडबाले यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना मुख्याध्यापक श्यामसुंदर मुळे, सुनील लटारे, योगेश्वर कुंभारे, पद्ममाकर वाळके, नानाजी पिठाले, अरुण रायपुरे, छत्रपती शंकरवार आदी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page