Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीमाध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकाची एस -8 प्रमाणे होणार वेतन निश्चिती
spot_img

माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकाची एस -8 प्रमाणे होणार वेतन निश्चिती

धानोरा तालुका प्रतिनिधी:- माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकांची एस- 8 प्रमाणे होणार वेतन निश्चिती
अनिल महादेव शिवनकर पूर्व विदर्भ संयोजक भाजपा शिक्षक आघाडी नागपूर विभाग नागपूर यांनी केले आश्वासित.
शनिवार दिनांक 7 /10 /2023 ला प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ मुंबई यांच्या वतीने राज्य महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप सर तसेच राज्य महासंघाचे महासचिव गोपीचंद कुकडे सर यांच्या मार्गदर्शनात अनिल महादेवराव शिवनकर यांचा छोटे खाणी सत्कार करण्यात आला.
त्यावेळी त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक यांना 12वर्षे सेवेनंतर एस-7 मध्ये चुकीची वेतन निश्चिती करण्यात आली याबद्दल निवेदन सुद्धा देण्यात आले .
त्यावेळी शिवनकर
यांनी याबद्दल शासन स्तरावर शक्य तितक्या लवकर पाठपुरावा करून एस-7 ऐवजी एस-8 प्रमाणे वेतन निश्चिती ची दुरुस्ती करून देण्याकरीता आश्वासित केले.
सत्कारला उपस्थित प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नागपूरचे अध्यक्ष प्रमोद भैसारे , गडचिरोलीचे अध्यक्ष भास्कर कायते ,नागपूरचे सचिव आत्राम ,प्रसिद्धीप्रमुख नागपूर जिल्हा ज्ञानेश्वर उमरे ,श्रीमान लक्ष्मण , फ्रान्सिस जोसेफ , सुरेश वंजारी , जगदीशजी होले , मनोज वैद्य , राजेंद्र गोमकर , भैस मॅडम ,रोशनी लालवानी मॅडम , गजभिये मॅडम व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
शिवणकर सरांनी दिलासादायक आश्वासित केल्यामुळे प्रयोगशाळा कर्मचारी बंधू -भगिनींनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page