Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरगंधारे गुरुजींचे शिक्षण सेवेसह सामाजिक कार्यात मोठे योगदान - माजी आमदार सुदर्शन...
spot_img

गंधारे गुरुजींचे शिक्षण सेवेसह सामाजिक कार्यात मोठे योगदान – माजी आमदार सुदर्शन निमकर


तालुका प्रतिनिधी राजुरा:- जि.प.शाळा सुकडपल्ली ता.राजुरा येथील मुख्याध्यपक पुरुषोत्तम गंधारे यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ सपत्नीक (8 ऑक्टोबर) रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन भावपूर्ण सत्कार कारण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गंधारे गुरुजी च्या कार्याप्रती शासकिय सेवेत असलेला परंतू प्रत्येक सामाजिक कार्यात धाऊन जाणारा धडाडीचा कार्यकर्ता, सुकडपल्ली 100 टक्के आदिवासी बहुल गाव असून 16 वर्ष नोकरी केली, सोबतच गावातील लोक व्यसनाधीन होते, अशा व्यक्तीचे व्यसनमुक्ती चे कार्य केले. अध्ययनाच्या मार्गाने मत परिवर्तन केले. अनेक लोक धर्म परिवर्तन केले होते, मात्र गंधारे गुरुजींनी गावातील लोकांना मूळ धर्मात आणले. गावकऱ्यांनी दिलेले सन्मानपत्र या मध्ये सुद्धा गंधारे गुरुजींच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. असल्याचे गौरोदगार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. पुढील जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा आपल्या हातून समाजकार्य घडावे. अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या स्नेहामिलन सोहळ्याला प्रमूख अतिथी माजी आमदार वामनराव चटप, आशिष देवतळे, सतिश धोटे, विमासी चे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, सत्कारमूर्ती पुरुषोत्तम गंधारे, सौ. प्रेमिला गंधारे, माजी सभापती निर्मला कुळमेथे, दिलिप वांढरे, ॲड.प्रशांत घरोटे, प्रदिप बोबडे, ग्रा.पं.सरपंच बैनाबाई आत्राम, नेफडो चे बादल बेले, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण चींतापुरी, ग्रा.पं.सदस्य संतोष मरस्कोल्हे, वासुदेव गौरकर, दिलीप देठे, मधुकर चिंचोलकर, कपिल इद्दे, सह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शाळांचे शिक्षकवृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page