Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरउपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंची निंबाळा जि. प. शाळेला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
spot_img

उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंची निंबाळा जि. प. शाळेला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत निंबाळा येथे जिल्हा परिषद शाळेला उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या परिपाठाला स्वतः आवर्जून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढविले, संवाद साधला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शालेय अभ्यासक्रम, उपक्रम व अन्य विविध बाबींवर चर्चा केली.
सरपंच नंदकिशोर वाढई हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे अनुयायी आहेत ते सामाजिक बांधिलकी जोपासनारे तळागाळातील लोकांपर्यंत नाळ जुळलेले व्यक्ती आहेत. गाव विकासासाठी विविध उपक्रम ते राबवित असतात. त्या अनुषंगाने शाळेला भेट दिली. शाळेची आस्थेने विचारपूस केली. शाळा इमारतीची पाहणी केली. शाळेच्या पटसंख्येच्या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारणा केली. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचा परिचय करून घेतला. काही प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी सरपंचांनी विचारलेल्या प्रश्नांना सुंदर उत्तरे दिली. बराच वेळ सरपंचांनी वर्गात विद्यार्थ्यासोबत घालविला, विद्यार्थ्यांना सुद्धा सरपंच आपल्या वर्गामध्ये आले यांचा आनंद झाला. सरपंच नंदकिशोर वाढई भारावून गेले व त्यांना आपण सुद्धा ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असतानाच्या जुन्या आठवणी जागा झाल्या. शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गोवारदिपे, भोंगळे सर, ग्राम सेवक मरापे, सामाजिक कार्यकर्ता दौलत मोटघरे, ओमकार आस्वले, श्रावण गेडाम, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे आदींची उपस्थिती होती.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page