Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरइन्फंट काॅन्व्हेंट येथे टॅलेन्ट शो चे आयोजन
spot_img

इन्फंट काॅन्व्हेंट येथे टॅलेन्ट शो चे आयोजन

राजुरा (ता. प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे इयत्ता आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य, वेशभूषा विनोद, प्रश्नमंजुषा, कोडे अशा विविध कलाविकारांचे सादरीकरण केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजूषा अलोणे, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचा पदभार वर्गशिक्षिका सोनाली कल्लूरवार तसेच नृत्य शिक्षक रितु संतोरे व तबला शिक्षक चांगदेय पोत्राजे यांनी सांभाळला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन रुक्मीनी येवले व राशी भोंगळे यांनी केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page