Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालयात आजी आजोबांचा केला सन्मान
spot_img

बोमनवार विद्यालयात आजी आजोबांचा केला सन्मान

चामोर्शी – स्थानिक जा.कृ. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात आजी – आजोबा दिवस नुकताच साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य ईतेंद्र चांदेकर तर प्रमुख अतिथी म्हणून मारुती बहिरेवार, हसन अली सय्यद, राजाराम चीजघरे ,प्रेमिका भांडेकर, कमलाबाई कोंडागुरले ,गोविंद मंडल ,शेखजी ,सुलोचना जेट्टीवार, शिला आलुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित मान्यवर आजी- आजोबा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक स. शि.कविता बंडावार यांनी केले . आजी आजोबांचा परिचय करून दिला, विद्यार्थ्यांना आजी आजोबाच्या कार्याबद्दल माहिती दिली. मृणाल तुंमपलीवार यांनी आजी – आजोबांचा नातवांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असतो व त्यांच्या कर्तव्या विषयी माहिती दिली. शाळेच्या विद्यार्थिनींनी भजन सादर केले तसेच आजींनी भजन सादर केले . त्यानंतर आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी फुगडी, संगीत खुर्ची इत्यादी खेळ घेण्यात आले. फुगडी – आजी-आजोबा व नातू – नातीन यांच्यात घेण्यात आली ,संगीत खुर्ची आजी-आजोबा यांच्यात घेण्यात आली. यामध्ये सर्वांनी भाग घेतला.

यात राजाराम चीजघरे यांनी प्रथम तर सुलोचना जेट्टीवार यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला .
आजी – आजोबांना बक्षीस, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षांनी आजी – आजोबा दिवसाचे महत्त्व, त्यांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले . संचालन मृणाल तुंमपलीवार तर आभार प्रदर्शन स.शि.अशोक गजभिये यांनी केले.

याप्रसंगी प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ,आजी – आजोबा, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page