Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीआर्थिक साक्षरता हे माणसाचे तृतीय नेत्र-प्रा.दिलीप टेप्पलवार
spot_img

आर्थिक साक्षरता हे माणसाचे तृतीय नेत्र-प्रा.दिलीप टेप्पलवार

चामोर्शी:- कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्थिक साक्षरता” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. करियर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. दिलीप टेप्पलवार इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येनापुर यांनी “आर्थिक साक्षरता हे माणसाचे तृतीय नेत्र ” आहे आणि विद्यार्थ्यांनी आपले सर्व व्यवहार हे सजग राहून केले पाहिजे. आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी करावयाची आर्थिक बचत, पैशाचे व्यवस्थापन ,खर्चाचे योग्य नियोजन इत्यादी विषयी
विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिल्हा प्रवर्तक करिअर कट्टा गडचिरोली माननीय डॉ.डी.जी.म्हशाखेत्री होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री यांनी प्रा. दिलीप टेप्पलवार यांचा शाल- श्रीफळ,सन्मानचिन्ह व महाविद्यालयाचे गोंडवाना विद्यापीठाकडून पुरस्कार प्राप्त ‘सुगंध’ वार्षिकांक देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक प्रा. वंदना थूटे मॅडम, सहाय्यक समन्वयक प्रा.अरुण टी. कोडापे यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे संचालन करियर संसदेचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेला समीर गुडेंकवार या विद्यार्थ्यांनी केले .तर प्रास्ताविक महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक प्रा.वंदना थूटे मॅडम यांनी केले. तर आभार उद्योजकता विकास मंत्री (करियर संसद) संयोग सामावर या विद्यार्थ्यांने मानले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.राजेंद्र झाडे,प्रा.डॉ.आर.डी.बावणे,प्रा.दीपक बाबनवाडे,प्रा मीनल गाजलवार, प्रा. मनीष राऊत,प्रा.वैभव मस्के,प्रा.रोशन गेडाम, प्रा.संकेत राऊत,प्रा.वैशाली कावळे,प्रा.स्नेहा उसेंडी, प्रा. शुभांगी खोबे,प्रा.जयश्री बोबाटे तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व विज्ञान व कला शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page