Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरआई- वडिलांची सेवा करणे मुलांचे आद्य कर्तव्य--माजी आमदार सुदर्शन निमकर
spot_img

आई- वडिलांची सेवा करणे मुलांचे आद्य कर्तव्य–माजी आमदार सुदर्शन निमकर

राजुरा येथे ज्येष्ठ नागरिक दीन साजरा

राजुरा :– तालुका ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्काम) च्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना प्रीत्यर्थ वयाची 75 वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 01 आक्टोंबर 2023 रोजी श्री वेंकटेश बालाजी मंदिर सभागृहात, गांधी चौक राजुरा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले की, समाजातील अन्य नागरिकांसह आई – वडिलांची सेवा करणे हे मुलाचे आद्या कर्तव्य आहे. वयस्क आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा आदरपूर्वक मान सन्मान करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ राजुराचे ज्येष्ठ सदस्य पांडुरंग चन्ने, कार्यक्रमाला विशेष अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप, आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा चे संचालक ॲड. अरुण धोटे हे होते. प्रमूख उपस्थिती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, उपाध्यक्ष विद्याप्रकाश कल्लूरवार, सचिव विजयराव वाटेकर, सहसचिव रामचंद्र मुसळे, कोषाध्यक्ष मधुकर जानवे, सौ. अल्का सदावर्ते, जयश्री देशपांडे, श्रीमती ठाकूरवार यांच्यासह मान्यवर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य डॉ. सुरेश उपगंनलावार, शंकरराव बानकर, रामचंद्र मारटकर, भास्कर येसेकर, अरुण जमदाडे, कुर्मदास पावडे, सुरेश बोधे, मनोहर टाके यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ज्येष्ठ मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page