Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीधानोरा उपजिल्हा रुग्णालयला नऊ कोटी रुपये मंजूर व भूमिपूजन खासदार...
spot_img

धानोरा उपजिल्हा रुग्णालयला नऊ कोटी रुपये मंजूर व भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न

महा आरोग्य शिबिरात जावून तपासणी करा,व आपल्या आरोग्याची काळजी घ्या–खा. नेते

दि.०३ऑक्टोबर २०२३

धानोरा:- मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसापासून सेवा पंधरवाडा’अंतर्गत दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज धानोरा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य आरोग्य मेळावा व महा आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत व आभा कार्डची नोंदणी व वितरण तसेच उप जिल्हा रुग्णालय धानोरा ला नऊ कोटी रुपये निधी मंजूर पन्नास खाटांचे भूमिपूजन सोहळा
आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ नेते साईनाथ साळवे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,भाजपा तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे, कृ.ऊ.बा.स. सभापती शशिकांत साळवे,माजी सभापती अजमल रावते,माजी पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हिचामी, डॉ.राजेश गजबे,ता.महामंत्री विजय कुमरे, देवराव मोगरकर,युवा मोर्चा चे सांरग साळवे, संजय कुंडु, साजन गुंडावार, राकेश दास, दिपेन सरकार,आसिफभाई,राकेश खरवडे,सुभाष धाईत,गणेश भुपतीवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना नागरिकांनी महा आरोग्य शिबिरात जावून आपल्या आरोग्याची तपासणी करा,व आपल्या आरोग्याची काळजी घ्या हा भाग अति दुर्गम भाग म्हणुन ओळखला जातो,याकरिता या भागात नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण जिल्हा उप रुग्णालय धानोरा या ठिकाणी पन्नास खाटांचे नऊ कोटी रुपयांचा निधी माझ्या प्रयत्नाने मंजूर झाला.निश्चितच यांचा फायदा नागरिकांना होईल
यांचा चांगला लाभ नागरिकांनी घ्यावा.असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी या भव्य आरोग्य मेळाव्याचा लाभ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी व तपासणी करत आयुष्यमान भव: व आभा या कार्डाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.

या निमित्याने खासदार अशोकजी नेते,यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शुभारंभ केला.

याप्रसंगी बहुसंख्य नागरिकांनी शुगर, बीपी, कॅन्सर,नेत्र तपासणी, मुख रोग तपासणी, हृदयरोग तपासणी, सिकलसेल ची आरोग्य तपासणी करून घेतली व आभा कार्डचा लाभ घेतला.
आरोग्य कर्मचारीवृंद, आरोग्य सेविका, आशा सेविका,तसेच मोठ्या संख्येने धानोरा चे नागरिक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page