Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीकेवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयावर पुरस्काराची बरसात
spot_img

केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयावर पुरस्काराची बरसात

चामोर्शी : – यशोदीप संस्था गडचिरोली द्वारा संचालित केवळरामजी हरडे कॉमर्स कॉलेजवर पुरस्काराची बरसात झाली .
गोंडवाना विद्यापीठाच्या 12 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात चामोर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयास एकंदर सहा पुरस्कार प्राप्त झाले .

नुकतेच 29 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मध्ये झालेल्या भव्य दिमाखदार कार्यक्रमात भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पवन नाईक यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला तसेच राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक हा राष्ट्रपती पुरस्कार याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु जान्हवी विजय पेद्दीवार हिला देण्यात आला आणि उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पथक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार केवळरामजी हरडे महाविद्यालयाच्या रासेयो पथकाला देण्यात आला . अशा तीन पुरस्काराने महाविद्यालयाचा गौरव झाला त्याप्रीत्यर्थ गोंडवाना विद्यापीठातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर ,डॉ पवन रमेश नाईक व कु जान्हवी विजय पेद्दीवार यांचा गडचिरोली चे आमदार डॉ देवराव होळी ,गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत महाराजा लॉन गडचिरोली येथे संपन्न झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या बारव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात शाल ,श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच केवळरामजी हरडे महाविद्यालयास विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक महाविद्यालयाचा विद्यार्थी अरबाज मुस्तफा शेख याला देण्यात आला त्याचबरोबर केवळरामजी हरडे महाविद्यालयाच्या वर्ष 2022-23 च्या वार्षिकांकास विद्यापीठस्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला करीता वार्षिकांचे संपादक डॉ महेश जोशी यांच्या सत्कार करण्यात आला .
विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी हा वर्ष 2022-23 हा पुरस्कार महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ पवन नाईक यांना देण्यात आला .

याप्रमाणे काल संपन्न झालेल्या गोंडवाना विद्यापीठ वर्धापन दिन कार्यक्रमात केवळरामजी हरडे कॉमर्स कॉलेज चामोर्शीवर पुरस्काराची बरसात झाली .
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे ,संस्थेच्या सचिव डॉ स्नेहा हरडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर यांनी समाधान व आनंद व्यक्त केला

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page