Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरवसतिगृह विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ज्येष्ठ नागरिक दिन
spot_img

वसतिगृह विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ज्येष्ठ नागरिक दिन


राजुरा (ता. प्र.):-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने चालविल्या जात असलेल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह राजुरा येथील विद्यार्थ्यांनी निराधार ज्येष्ठ नागरिकांना साबण, दंत मंजन, खोबरेल तेल, गूळ चिक्की,दुपट्टा आदी जीवनावश्यक साहित्य देऊन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी बस स्थानक व शहरातील चौक परिसरात, मंदिरात राहणाऱ्या १० निराधार ज्येष्ठ नागरिकांना मदत केली. सदर दिनाच्या औचित्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली गेली. यावेळी वसतिगृहाचे गृहपाल श्री धोडरे व इतर विद्यार्थी हजर होते. यासाठी चंद्रपूर चे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त श्री. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page