Friday, February 23, 2024
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघ राज्य स्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धे करिता घोषित
spot_img

चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघ राज्य स्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धे करिता घोषित

बल्लारपूर(ता.प्र. मयुर खेरकर) – महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित राज्य स्तरीय ज़्यूनियर अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 14 व 16 वर्षा आतील मुले व मुली यांची स्पर्धा एस. वी.जे.सी.टी.स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देरवण जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित केलेली आहे. या सर्धेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघ रवाना झाला आहे. सदर स्पर्धेत वयोगट १४ वर्षाआतील मुले व मुलीमध्ये इशान भोयर ,मुकुंदा कामपेलिवार ,अजिंक्य आत्राम ,रौनक गेडाम,गौरव पिलारे,समृद्ध वैरागड़े , कु महि अवसारे, कु तुलसी मेश्राम, कु किंजल भगत, कु हर्षाली उरकुड़े, कु रुकसाना सलमानी, कु अनुष्का मांडवकर, तसेच १६ वर्षाआतील मुले व मुलीमध्ये तुषार पचोरी, सोहम मोरे,संकेत सौन्दरकर,हिमांशु हिंगाने,सुन्दांशु पटेल, प्रणय उपासे,निहाल शेतिये, अंकित यादव,यश मेश्राम,प्रसाद धकाते, यश निकुरे, सोहम मोरे, चैत्यन्य नवलखेड़े, कृष्णा रोहने, सेहल सोनी यांचा समावेश आहे तसेच मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर अजिंक्य स्पर्धात वयोगट 18 व 20 वर्ष आतील मुले व मुलीमध्ये दर्शन तिवडे, करण कर्डे, मेगश्याम प्रधान, ऋषिकेश सोनवाने, यश सातपुते, कुणाल यादव, भारतवाज गायकवाड, कु सोनिया नरल, कू. प्रिया झाड़े, कू सोनल फाये, युवान कोंडावार, साजन कावले,कीर्तिवान नागोसे, कु पूनम गिरटकर् ,जानवी हजारे यांची निवड झाली आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूना चंद्रपुर जिल्हा ॲथलेटिक्स आसोसिएशनचे अध्यक्ष डॉ दिलीप जयस्वाल, सचिव मा.सुरेश अडपेवार, निवड समिती प्रमुख कु पूर्वा खेरकर, निवड समिती सदस्य प्रा. संगीता बांबोळे, कु वर्षा कोयचाळे, रोशन भुजाडे, विजय भगत, स्वप्नील सायंकर, चैतन भजभुजे, मयूर खेरकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेत यशस्वी सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page