Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीगट ग्रामपंचायत निमनवाडाचे विभाजन करुन स्वतंत्र निमगांव ग्रामपंचायत द्या--गावकऱ्यांचे निवेदनातून मागणी
spot_img

गट ग्रामपंचायत निमनवाडाचे विभाजन करुन स्वतंत्र निमगांव ग्रामपंचायत द्या–गावकऱ्यांचे निवेदनातून मागणीधानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातील निमनवाडा गट ग्रामपंचायत ता. धानोरा जि. गडचिरोली अंतर्गत मौजा निमगांव निमनवाडा, मासरीगाटा, बोरी या चार गावाचा समावेश आहे.यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या निमगाव येथिल असल्याने निमनवाडा गट ग्रामपंचायत चे विभाजन करून निमगाव येथे स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची मागणी निमगाव येथिल गावकऱ्यांनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,सन २०११ च्या जनगणनेनुसार मौजा निमनवाडा (२७५),बोरी(307), निमगांव (१२१६),मासरगाटा (१८१)येथील एकुण लोकसंख्या १९७९ असुन या चारही गावापेक्षा सर्वात जास्त लोकसंख्या निमगांव या गावाची आहे. मागील सन १९९९ पासुन प्रशासनाकडे स्वतंत्र निमगांव ग्रामपंचायत करण्याचे प्रस्ताव दिले असतानाही प्रशासनाने वेळोवेळी पंचायत समिती स्तरावर पुढे सादर केलेले नाही.

गावकऱ्यांची मागणी असताना सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे . नव्याने ग्रामपंचायत विभाजन करून देण्यासाठी दिनांक २३/०८/२०२३ ला पंचायत समिती धानोरा कडे विभाजनाचा प्रस्ताव सादर केलेला आहे.१२आक्टोबर २००४च्यापरिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की.स्वंतत्र ग्रामपंचायत प्रस्तावाकडे दुर्लक्ष न करता समोर लगेच समोर पाठवुन कारवाई करावी. पंचायत समिती गावकऱ्यांनी विभाजनाचा प्रस्ताव सादर करुन एक महिना झाला.तरी संबधित विभाग यावर काहिच निर्णय न घेता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जर निमगांव वासीय जनतेची मागणी पुर्ण न झाल्यास येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर निमगांव वासीय जनतेचा बहिष्कार राहील.असेही निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रस्तावाचा व निमगांव वासीय जनतेचा विचार करुन निमनवाडा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन निमगांव या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती करावी. निमगांव ला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा.निवेदन देताना चेतन सुरपाम उपसरपंच,देवराव जी मोंगरकर, गजानन मेश्राम,तुळशिदास कुकडकार,गुणवंत खोब्रागडे आदि मान्यवर उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page