Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीओबीसी जागर यात्रा" मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-आमदार डॉ देवराव होळी यांचे...
spot_img

ओबीसी जागर यात्रा” मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-आमदार डॉ देवराव होळी यांचे पत्रकार परिषदेमधून आव्हान

४ आक्टोंबर गडचिरोलीतील सुमानंद सभागृहात दुपारी १२ वाजता होणार “ओबीसी जागर मेळावा”

दिनांक २ आक्टोंबर २०२३ चामोर्शी:- सरकारने ओबीसीसाठी राबविलेल्या योजनांची माहिती व ओबीसी समाजाच्या नेहमी पाठीशी राहण्याचे काम भाजप करीत आहे . ओबीसी समाजासाठी केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आज दि . 2 ऑक्टोंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमधून आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले आहे.पुढे सांगितले की महाराष्ट्रातील ओबीसी घटकाला संघटित करण्याकरिता तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर माहितीचा आलेख सर्वसामान्य जनतेच्या समोर प्रत्यक्षपणे मांडण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी जागर यात्रेचे आयोजन पूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्याचबरोबर ही यात्रा सुमारे ४४ विधानसभा व ९ लोकसभा क्षेत्रांत मार्गक्रमण करेल. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ही यात्रा ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी मुक्कामी येत असून दिनांक ४ ऑक्टोबरला ओबीसी जागर मेळाव्याचे आयोजन सुमानंद सभागृहात दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. या जागर मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.या जागर यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार डॉ. आशिषजी देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री संजयजी गाते करणार आहेत.या यात्रेच्या दरम्यान ९ वर्षातील ओबीसी करिता केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची विस्तृत माहिती देणारे पत्रक सर्वसामान्य जनतेमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार माध्यमातून ओबीसी करिता राबविण्यात येणाऱ्या या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त घेऊन या जागर यात्रेमध्ये सामील व्हावे असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जयराम चलाख, भाजपा नेते उमेश कुकडे, तालुका महामंत्री भोजराज भगत, दिपक वासेकर, रामचंद्र वरवाडे, विकास मैत्र, अनिल भैसारे, विमल सेन, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page